Monday, March 21, 2011

rajasthan treep

           आम्ही २० फेब.ला राजस्थान ट्रीपला गेलो. पहिला मुक्काम जोधपुर येथे होता.राजस्थानातील सर्व शहरे ऐतिहासिक आहेत.शूर राजपूत राजांची वीरगाथा ऐकून स्फुरण येते.हा मेहेरानगड प्रसिद्ध असून,त्यात राजपूत राजांचे शौर्य जागोजागी दिसून येते,जोधपूरला ब्लू सिटी म्हणतात.उम्मेद भवन येथे अजूनही राजा राहतो.१/३ 
भाग हॉटेलसाठी दिलेला आहे.किल्ल्याला बारीक नक्षीकाम केलेले पाहून थक्क व्हायला होते.हम साथ साथ हे चे  एक गाणे इथे शूट केलेले आहे,( म्हारी हिवडा मे नाचे मोर  )

         उम्मेद भवन इथे राजाने म्युझियम केलेले आहे.त्यातील घड्याळाचे कलेक्शन पाहण्या सारखे आहे.१/३ भाग  ताज ग्रुपला हॉटेलसाठी दिलेला आहे. एका रूमचे भाडे १ लाखापासून आहे.
          पुढील मुक्काम जैसलमेर येथ होता.प्रत्येक सिटी चे एक वैशिष्ट्य आहे.जैसलमेर ला गोल्डन सिटी म्हणतात.येथील गोल्डन फोर्ट आणि त्यातील जैन मंदिर पाहण्या सारखे आहे.गावातील सर्व घरे पिवळ्या दगडाची आहेत म्हणून सन सिटी पण म्हणतात.तसेच स्यामचे वाळवंट पण आहे,तिथे क्यामल राएड घेतली 
आणि वाळवंटात फोक डान्स तसेच दाल बाटी आणि चुरमा याचा आस्वाद घेतला.
        जैसलमेर इथून बिकानेर हे पुढील ठिकाण होते.इथील प्रत्येक ठिकाणचे राजवाडे हे खूपच सुस्थितीत ठेवलेले आहेत.खाजगी संस्था त्याची देखभाल करतात,हा किल्ला राजा राजसिंग याने १४८८ साली बांधला,त्याला ३५० वर्षे लागली.प्रवेशद्वार ६५ किलो चांदीचे आहे. राजाला १६५ राण्या होत्या.
     
      बिकानेर नंतर आम्ही कर्निमाता मंदिर येथे गेलो.मंदिरात सर्वत्र उंदीरच उंदीर आहेत.तेथून जयपूर या पिंक सिटीत गेलो. या सिटीला पिंक सिटी का म्हणतात ते कळले.पुराने शहर सर्व गुलाबी रंगाने रंगविलेले आहे.
घरे,दुकाने सर्व गुलाबीच आहेत. जगप्रसिद्ध राजमंदिर सिनेमागृह पण इथे आहे,आतील interiar खूपच अप्रतिम आहे.इथे दिल्लीसारखाच जनपथ रोड आहे.
       गुलाबी दगडात बांधलेला हवामहाल,जंतर मंतर,बिर्ला मंदिर,आणि प्रसिद्ध सिटी प्यालेस पण इथेच आहे.
हवा महेल इथून राण्या रस्त्यावरून जाणारी मिरवणूक पाहत असत.सिटी प्यालेस अजूनही छान जतन केलेला आहे. जयपूर पासुन काही अंतरावर अमेर फोर्ट किवा अंबर फोर्ट आहे. तो पण भव्य आहे,त्याची सीमाच १० कि.मी.ची आहे.अंबरीश हे शंकराचे नाव त्यापासून अंबर किवा अमेर हे नाव पडले. यात प्रत्येक रुतुसाठी प्रत्येक राण्यासाठी वेगवेगळे महाल बांधलेले आहेत.तसेच पाण्यात बांधलेला जलमहाल पण आहे.
          सिटी प्यालेस मध्ये राजा राणीचे भारी भारी कपडे आणि हत्यारे यांचे म्युझियम आहे.तसेच काही भागात सध्या पद्मनाभ राजे राहतात.दिवाण ए आम आणि दिवाण ए खास हे पाहण्या सारखे आहे.दिवाण ए खास येथे 
३४५ किलो वजनाचे चांदीचे भांडे आहे,राजा जेव्हा लंडनला जात असे तेव्हा गंगाजल भरून त्यात नेत असे .
भिंतीवर मोराचे सुंदर नक्षीकाम केलेले आहे.दिवाण ए आम येथे देशातील २ नंबरवर असलेले सुंदर झुंबर आहे.

   जंतर मंतर हे हवामान शाश्त्रावर आधारित आहे,यातून हवामानाचा अचूक अंदाज अजूनही काढता येतो.
जयपूर येथून आम्ही अजमेर या मुस्लीम दर्ग्याच्या दर्शनास गेलो. तिथे प्रचंड धक्काबुक्की होती.
     अजमेर करून आम्ही पुष्कर या पवित्र स्थळी गेलो.जगातील एकमेव ब्रम्ह देवाचे मंदिर येथे आहे.राजस्थानातील लोकांचे हे काशी क्षेत्रच आहे.तसेच इथे  अनेक मंदिरे आहेत. येथे फोरेनर्स पण खूप येतात.
आमचे हॉटेल तर इतके सुंदर आणि एकांत ठिकाणी होते कि,इथून हलवेसेच वाटत नव्हते.हॉटेलमध्ये स्पा,जिम,स्विमिंग पूल आणि अनेक कासवे होती.
         पुष्कर वरून सकाळी ५ वा.निघून आम्ही राणाप्रताप या शूर राजाचा किल्ला चितोडगड येथे गेलो. हा किल्ला आशिया खंडातील सर्वात मोठा आणि भारतातील सर्वात महत्वाचा किल्ला आहे.कारण इथूनच पुढे भारताचा महत्वाचा इतिहास घडला. हे ठिकाण म्हणजे,भक्ती,शक्ती,आणि बलिदानाचे प्रतिक आहे.मीराबाईचे
एकमेव मंदिर येथे आहे. राजपुतांच्या विजयाचे प्रतिक  असलेला विजयस्तंभ पण आहे.राणी पद्मिनी आणि अनेक स्त्रियांचे जोहार केलेले स्थळ पण इथेच आहे,हा सर्व इतिहास पाहून आणि बघून उर भरून येतो.नवीन 
पिढीतील मुलांना हे स्थळ जरूर दाखवावे.
     चितोडगड पाहून श्रीकृष्णाचे प्रसिद्ध मंदिर नाथद्वारा येथे गेलो. वेगवेगळ्या पूजेसाठी हे मंदिर तासा तासाने बंद ठेवतात. तिथून एकलिंगजी या शंकराचे मंदिर बघितले. शिवरात्र असल्याने तेथे यात्रा भरली होती.हि दोन्ही 
मंदिरे राजस्थानात प्रसिद्ध आहेत.
     
    उदयपुर या शहराला व्हाईट सिटी तसेच लेक सिटी म्हणतात.कारण येथे खूप लेक आहेत,आरवली पर्वताच्या मध्यात आणि सरोवरांनी वेढलेल्या स्थितीत असे एक खूप सुंदर शहर आहे.मोतीमगरी हे शूर राजा राणा प्रताप याचे स्मारक आहे.हलदी घाटीचे युद्ध,चेतक घोडा वगैरे इतिहास इथे चित्रित केलेला आहे.फतेहसागर,पिचोला,
स्वरुपसागर,दुधसागर लेक येथे आहेत.राणा प्रताप यांचा पुतळा महाराष्ट्रातील सांगलीच्या कलाकारानेच 
बनवलेला आहे.सहेलीयोकी बाडी,पपेट शो,बघून हॉटेलवर परत आलो.
     प्रत्येक लेकमध्ये एक एक सुंदर प्यालेस किवा एखादी सुंदर इमारत इथे हमखास दिसेलच .सर्वात महागडी लग्ने,जसे सिने कलाकार,प्रसिद्ध खेळाडू ,राजकारणी व्यक्ती यांची येथील लेक प्यालेस मधेच होतात.जग्मंदीर 
असेच लेकमध्ये बांधलेले आहे.देशात २ नंबरचा असलेला सिटी प्यालेस बांधायला ४०० वर्षे लागली.तो २२ राजांनी मिळून बांधला. हे राजे सूर्यवंशी होते,म्हणून दर्शनी दारावर सूर्याचे चिन्ह आहे.शत्रूने सरळ हल्ला करू नये म्हणून भूलभूलया पद्धतीचे रस्ते आहेत.आम्ही गेलो तेव्हा राजकुमारी च्या लग्नाची गडबड चालू होती.
      उदयपुर नंतर रानकपुर येथील सुप्रसिद्ध जैन मंदिर बघितले.या मंदिरातील नाजूक कोरीवकाम बघून आश्चर्य वाटल्या शिवाय राहत नाही. तिथे क्यामेरा आणण्यास परवानगी नाही.मंदिरात नाजूक काम केलेलेएकूण ८४ खांब आहेत.मंदिर आरवली पर्वत राजीने वेढलेले असून निसर्गरम्य ठिकाणी आहे.
           माउंट अबू हे राजस्थानातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे,कारण मेवाड आणि मारवाड हे राजस्थानचे
दोन विभाग पडत असून मारवाड म्हणजे वाळ्वंत  आणि मेवाड म्हणजे हिरवाई असे भाग आहेत.माउंट अबू हे 
मेवाड्मध्ये येते.इथे प्रसिद्ध असे दिलवाडा जैन मंदिर आहे.ते सुद्धा चार भागात आहे.हे मंदिर ज्या कलाकारांनी 
बांधले त्यांनी स्वतःच्या कमाईचे असे वेगळे मंदिर बांधले आहे तेच खूप छान आहे.

     माउंट अबू येथे प्रजापिता ब्रम्हा कुमारीज विद्यालय चे प्रमुख केंद्र आहे,ते पण पाहण्या सारखे आहे.तिथे खूप शिस्त आणि शांतता दिसली.तसेच अर्बुदा मंदिर आणि नक्की लेक आहे.
       अशा प्रकारे संपूर्ण राजस्थान हि ट्रिप १४ दिवसात पूर्ण करून आम्ही पुण्याचा रस्ता धरला.