एप्रिल मध्ये आम्ही सुब्रतो राय सहारा स्टेडीयम येथे आय .पी .एल . म्याचेस पाहायला गेलो हि संधी मला पाटील म्याडम मुळे मीळाली एरव्ही आपण टि . व्ही . वर म्याच पाहतो पण स्टेडीयम वरील मजा कूछ औरच असतो तिथे खूप एक्साईट मेंट असते .
माणसे इतक्या प्रकाराचे वेश करून आले होते कि,वाटावे इथे जत्राच भरली आहे. कुणी फेटे घातले होते, कुणी पुणेरी पगडी घातली होती ,तर कुणी
जोकरची टोपी घातली होती कोणी तोंडावर आपल्या तिरंगी झेंड्याचे तीन रंग केशरी,हिरवा आणि
आणि पांढरा असे रंग लावले होते .
हातात वाजवण्यासाठी पिपाणी आणली होती तर कोणी बाजा तर कोणी शिट्टी आणली होती खेळाडूने फोर मारली कि,हे वाद्य वाजवत असत आणि आपला आनंद व्यक्त करत असत. सिक्स मारली कि,तर सरळ खुर्चीवरच उभे राहत असत आणि जोरजोराने ओरडत असत.
कोणी खुर्चीवर उभे राहून डान्स करत होते. तिथे वय आडवे येत नव्हते यात सगळे लहान मुले,प्रौढ व्यक्ती तसेच म्हातारी माणसे देखील होती . सगळे जन आपले वय विसरून खेळाचा आनंद घेत होते इतकेच काय स्त्रिया आणि तरुण मुली देखील जोराने ओरडून उडया मारत होते . सगळे वातावरणच भारावून गेले होते . म्याच पुणे वोरीयर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये असल्याने प्रेक्षक पुणे वोरीयर्सला जोरजोरात सपोर्ट करीत होते खेळाडूला स्फूर्ती यावी म्हणून त्यांना प्रोत्साहन देत होते . त्यातूनच खेळाडू प्रेक्षकांच्या जवळ बॉल घेण्यासाठी आले कि,मग तर विचारायलाच नको . हात हलवणे त्याला हाय करणे असे चालू होते . एकूणच काय सगळे वातावरण भारावून गेलेले होते . खूपच मजा येत होती . लोक तहान भूक विसरून खेळ बघत होते . रात्रीचे 12 वाजले तरी कुणाला खायचे भान नव्हते, काहीतरी चिरीमिरी खाणे चालू होते
ज्या संघाच्या खेळाडूने सिकसर मारला किंवा फोर मारला त्या संघाच्या
चीअर गर्ल्स हातात फुलांचे गुच्छ घेवून नाचत होत्या सगळे भान विसरून गेले
होते, एव्हढे मग्न झाले होते कि कशाचेच भान नव्हते .
खेळ सुरु होण्या पूर्वी प्रसिध्द तारका यांचे सुंदर सुंदर डान्स झाले . स्टेडीयमचे उद्घाटन करण्यासाठी अमिताभ बच्चन आले होते, त्यामुळं सगळेजण खूप उत्सुक होते .उर्मिला मातोंडकर , रविना टंडन , प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ , शमिता शेट्टी अशा 9 ते 10 प्रसिध्द तारका आल्या होत्या त्यामुळे प्रेक्षक खूपच उत्साही झाले होते . त्यांचे डान्स झाल्यावर खेळ सुरु झाला .
काही मुली नऊवार साडया नेसून आल्या होत्या त्या पुणे वोरीयार्स च्या बाजूने डान्स करत होत्या पुण्याच्या खेळाडूने सिकसर मारली कि त्या हातात गुच्छ घेवून नाचत होत्या . अशा प्रकारे खूपच रंगतदार माहोल होता . त्यात पुणे वोरीयार्स ने म्याच
जिंकल्याने सगळ्यांच्या आनंदाला उधान आले होते . सगळे नाचत नाचत
आनंदाने घरी निघाले पण हा अनुभव एक वेगळाच होता . तो कधी विस्मरणात जाणार नाही . माझी विल पॉवर एव्हढी जबरदस्त आहे कि माझ्या मनात एखादी गोष्ट आली कि , ती मला अचानकच मनी ध्यानी
नसताना मिळते आणि माझा आनंद द्विगुणीत होतो त्यामुळे मी
परमेश्वराची अत्यंत आभारी आहे .