Friday, June 23, 2017

शुक्रताल भागवत सप्ताह

आम्ही २ फेब्रुवारी रोजी दिल्ली वरून १३७ कि. मी. अंतरावर असलेल्या शुक्रताल या गावी भागवत सप्ताहा साठी गेलो. परीक्षित राजाला आठ दिवसांनी मरण येणार असते, महर्षी शुकाचार्य यांनी भागवत कथा  सांगितली आणि परीक्षित राजा अमर झाला, त्यामुळे या ठिकाणचे खूप महत्व आहे,या ठिकाणी असलेल्या महाकाय वटवृक्षाखाली हि कथा ऐकावी असे म्हणतात,त्यामुळे आमची भागवत कथा याच वटवृक्षाखाली ७ दिवस आयोजित केली होती.        
                   

                                                         


हि भागवत  कथा सांगण्यासाठी श्री.गोविंग गिरीजी महाराज उर्फ अशोकजी व्यास हे आले होते,त्यांच्या रसाळ वाणीतून 
भागवत कथा ऐकण्याचा आम्हाला लाभ मिळाला. सात दिवस त्यांनी आपल्या रसाळ वाणीने आम्हाला मंत्रमुग्ध केले .
त्यांनी कथेमध्ये एखादे भजन केले कि,आम्हा श्रोत्यांना  एकदम स्फुरण चढायचे आणि सगळे भान हरपून आणि तल्लीन होऊन नाचायला लागायचे . 



भागवत कथा चालू असताना एकादशी आली,तो दिवस पवित्र म्हणून आम्ही सकाळी ५ वाजता उठून गंगेवर स्नानासाठी गेलो तिथे जाताना ताल,आणि मृदंग याचा गजर करत आणि मुखाने देवाचे नाव घेत आम्ही सर्वजण गेलो आणि 
गंगेत स्नान केले. 


लोकांनी स्नान केल्यानंतर  गंगेची पूजा केली आणि गंगेत दिवे सोडले . तसेच परत आम्ही मुक्कामी जाताना भजन 
करतच गेलो . 



एक दिवस आम्ही दुपार नंतर थोडा वेळ काढून ६० कि.मी. अंतरावर , कौरव आणि पांडव याची राजधानी 
असलेल्या हस्तिनापूर  या गावी गेलो. आता तिथे ५००० वर्ष नंतर कौरव आणि पांडव याच्या काहीही खुणा नाहीत, परंतु 
आम्हाला उत्सुकता म्हणून आम्ही तिथे गेलो, आता या ठिकाणी जैनांची सुंदर सुंदर मंदिरे बांधलेली आहेत. 


आम्ही हि मंदिरे बघितली तसेच पांडव ज्या शिव मंदिरात पूजा करत असत ते मंदिर बघितले. 

आमचा दिनक्रम हा सकाळी ७.३० ला सुरु व्हावयाचा. प्रथम विष्णू सहस्त्रनाम ,त्यानंतर साधुसुद्धा ग्रंथाचे पारायण 
त्यानंतर नास्ता,१ तास ब्रेक त्यानंतर १० ते २ वाजेपर्यंत श्रीमान अशोकजी व्यास यांच्या सुश्राव्य वाणीतून भागवत कथा. 


भागवत कथा सुरु होण्याचे आधी श्री.ज्ञानेश्वर महाराज साधू याच्या हस्ते भागवत पोथीची आरती होत असे. मधून मधून 
महाराज भजन म्हणत असत,त्यावेळी सर्व श्रोते इतके उत्साहाने उठून नाचत आणि भजनात एकदम तल्लीन होत असत 


स्वामीजींचे साथीदार तर इतक्या सुंदर आवाजामध्ये गात कि ते भजन संपूच नये असे वाटत असे . ज्यावेळी 
कृष्णाचा जन्म झाला तेव्हा तर सर्व श्रोते बेभान होऊन स्वतः भोवती गिरक्या घेऊन नाचायला लागले,त्यात वृद्ध 
स्त्रिया,पुरुष पण सामील होते . ज्या दिवशी कृष्ण जन्म आख्यान होते त्या दिवशी कृष्णाला पाळण्यात घालून त्याचे 
नाव ठेवण्यात आले . 


श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला , त्यादिवशी गोवर्धन पर्वत केला आणि काला खाल्ला त्या दिवशी छपन्न भोग 
देवासमोर मांडले होते . 



श्रीकृष्ण रुक्मिणी विवाहाच्या दिवशी कृष्ण आणि रुक्मिणी तयार करून त्यांचा विवाह लावला . त्याच दिवशी 
महाराजांच्या भक्तांनी भारुडे सादर केली,त्यांना जे बक्षीस मिळाले ते त्यांनी साधू महाराज यांच्या स्मारकासाठी 
दान दिले . एकनाथ महाराजांनी रचलेली भारुडे छान होती 



                  आम्ही एक दिवस शुक्रताल हे गाव बघण्यासाठी गेलो,तिथे अनेक देवी देवतांच्या उंच उंच मुर्त्या बनवलेल्या होत्या  . तसेच एका गार्डन मध्ये कल्पवृक्ष पण होता, त्याचे खूप महत्व आहे असे कळले. 


कल्पवृक्षाला प्रदक्षिणा घातल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात असे म्हणतात. त्या गार्डन मध्ये वेगवेगळी औषधी 
वनस्पती देखील होत्या . तसेच खूप जुनी आणि दुर्मिळ झाडे होती .                                                           


काही स्त्रिया कल्प वृक्षाला प्रदक्षिणा घालत होत्या . गार्डन मध्ये वेगवेगळ्या सुंदर मुर्त्या पण होत्या . 


दररोज संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत वेगवेगळ्या महाराजांचे कीर्तन असायचे, एक दिवस चैतन्य महाराज 
देगलूरकर महाराजांचे कीर्तन होते,त्यादिवशी श्रोते वेळेच्या आधी सभा मंडपात हजर होते,सर्वाना त्यांचे कीर्तन ऐकण्याची एव्हढी उत्सुकता होती कि सगळे वेळेच्या आधी हजर होते,त्यांचे कीर्तन कधी संपूच नये असे वाटत होते . दोन ते अडीच तास सर्व श्रोते मंत्रमुग्ध होऊन कीर्तन ऐकत होते,कीर्तन कधी संपूच नये असे वाटत होते . त्या दिवशी खुद्द अशोकजी 
व्यास सुद्धा कीर्तन ऐकण्यासाठी हजर होते . 


सातव्या  दिवशी जेव्हा श्रीकृष्णाचा अंतकाळ झालेला सांगितलं आणि भागवत कथा संपली तेव्हा आमच्या मनाला 
खूप हुरहूर वाटली ,कारण महाराजांच्या रसाळ वाणीतून कथा ऐकता ऐकता कधी सात दिवस सम्पले  कळलेच नाही . 
शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन झाले आणि सप्ताह समाप्ती झाली तेव्हा एकदम रिते रिते झाले, कारण हे सात दिवस 
आम्ही घरदार ,संसार विसरून भगवंताशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला होता . मंदिरात असलेले हेच ते भव्य वडाचे झाड . 


ज्याच्या भोवती बायका प्रदक्षिणा घालून पूजा करत होत्या,ज्याच्या खाली बसून शुकाचाऱ्याने भागवत कथा सांगितली . 
आम्ही भागवत कथा संपल्या नंतर दिल्ली येथे अक्षर धाम मंदिर पाहण्यासाठी गेलो ,हे आपल्या भारतात सर्वात भव्य असे मंदिर आहे . 


त्यानंतर आम्ही राष्ट्रपती भवन येथे मुघल गार्डन बघण्यासाठी गेलो ,जे वर्षातून फक्त फेब्रुवारी महिन्यात प्रेक्षकांना बघण्यासाठी खुले असते .                                                                                                                  


                        या गार्डन मध्ये वर्षातून एकदाच फुलणारी  टूलिपची फुले तसेच दुर्मिळ असे डेलिया, झेंडू वेगळी शेवंती अशी सुंदर सुंदर फुले फुलतात .                                

           
                                                                           
तसेच विविध फुलांचे ताटवे ,औषधी वनस्पती,खूप जुने वडाची झाडे पण होती, तसेच बोन्साय केलेली झाडे पण होती. 



विविध फुलांनी गालिचे काढले होते, तसेच गोलाकार विविध फुले लावून आत कारंजी सुरु केलेली होती . 


विविध रंगांची फुले फुलल्यामुळे सगळीकडे डोळ्याला सुखद दृश्य दिसत होते .                        



पूर्ण मुघल गार्डन बघण्यासाठी २ ते ३ तास लागले तरीही तिथून बाहेर पडावेसे वाटत नव्हते,पण गार्डन बंद झाल्याने आम्हाला   बाहेर यावे लागले . अशा तर्हेने आमची हि सप्ताह कम दिल्ली टूर खूप समाधान कारक झाली . 


असे भागवत सप्ताह वारंवार होत राहावेत ,त्या निमित्ताने भगवंताचे सानिध्यात राहून नामस्मरण करण्याचे भाग्य 
लाभते 









                                                                     

No comments:

Post a Comment