९/५/०९ - ट्युलिप फेस्टिवल
साधारण मे च्या मध्यात इथे ट्युलिपची फूले उगवतात, वेगवेगळ्या रंगाची असतात. यूरोपातील अॅमस्तरडॅम मधे ही फूले जास्त फुलतात.
अलबेनी येथे टुलिप फेस्टिवल होते, तिथे शेकडो रंगांची आणि आकाराची ट्युलिपची फूले होती. छान गार्डन होते.
१०/५/०९ - मदर्स डे आणि मायबोली ए वि ए ठी
मदर्स डे असल्याने माझ्या मुलीने केक केला, पर्स आणली आणि साजरा केला.
मायबोली ही एक साईट आहे त्यावरील सभासद वर्षातून २-३ भेटतात ह्या गेटटुगेदर ला ते म्हणतात, ए वि ए ठी (एके वेळी एके ठीकाणी). त्याच दिवशी ह्या वेळी ते शेरवुड पार्क येथे झाले. सगळ्यांनी खुप पदार्थ आणून मस्त दिवसभर मजा केलि.
१६/५/०९ - सवेल्ली डॅम
विंडसर पासून जवलच सवेली डॅम आहे. तिथे छान निसर्ग आहे. तिन्ही बाजूने डोंगर आणि त्यात निळेसर पाणी. भोवती हिरवी हिरवी झाडे, वरुन तर खुपच अप्रतिम दृश्य दिसत होते. इथला निसर्ग काही औरच आहे.
वॉशिंगटन ही यु. एस. ची. राजधानी, तिथे कॅपिटोल ही संसद बिल्डिंग, आतून बघायला परवानगी आहे, या बिल्डिंगचे एन्टेरियर अप्रतिम आहे. सकाळी रांगेत लागुन आम्ही तीकिटे मीळवली.
बराक ओबमाच्या व्हाइट हॉउसला अजिबात सिक्युरिटी दिसली नाही. तिथे वॉशिंगटन मोनुमेंट, जेफ़रसन मुझियम, इंडियन मुजियम आहे.
जवळच शॉनएंडदो ह्या नैसर्गिक केव्हस आहेत, त्या ७५ फुट खाली आहेत. एक केव्ह मधिल फोरमेशन क्रिस्टल सारख्या दिसतात, काही प्राण्याचा भास होतो तर एक ठिकाणी शंकराची पिंड दिसते.
३०/५/०९ - मेमोरियल डे परेड
न्यू ब्रिटन येथे मेमोरियल डे निमित्त परेड होती, त्यात म्हातारी माणसे, लहान मुले, बायका, सैनिक या सर्वानी भाग घेवून कवायती केल्या. परेड खुपच शिस्तबद्ध होती.
३१/५/०९ - लग्नाचा वाढदिवस
हा आमच्या लग्नाचा ३४ वा वर्धापन दिवस होता, तो माझ्या मुलीने आणि जावयाने खुपच छान साजरा केला. आम्ही जिलेट कॅसलला गेलो, अगोदर आम्ही रेल्वेने गेलो आणि नंतर बोटीने नदीतून १ तास फेरफटका मारला. ही राइड पण खुपच छान होती, कारण नदीकाठी छान छान बंगले होटल्स होते ते पहाण्यास मजा आली. नदीच्या दोन्ही बाजूने हिरवी गर्द झाडी होती.

No comments:
Post a Comment