Wednesday, September 30, 2009

अमेरिकेतील रम्य दिवस - सप्टेंबर महिना


१/९/०९ - यांकी कँडल व्हिलेज (Yankee Candle Village)
साऊथ डिअरफिल्ड (South Deerfield) या गावी यांकी कैंडल फॅक्टरी आहे. तिथे उत्पादन पण होते आणि विक्री पण होते. हे दुकान एखाद्या म्यूझीयम सारखेच आहे. विविध रंगी,विविध आकाराची,आणि सुगंधी असे इथे मेनबत्त्यांचे ४००० प्रकार आहेत. इकडे ख्रिसमस या सणाला कँडलचे खुप महत्व असते. त्यामुले इथे ट्रडिशनल पद्धतीने मेनबत्त्या तयार होतात. वेगवेगळ्या थिमवर दृश्य बनवलेली आहेत. कुठे माणसे स्कीइंग करत आहेत, कुठे केबल कारने माणसे वर जातायत, बर्फात गाव कसे दिसते, असे अनेक प्रकार इथे तयार आहेत. त्यापैकी कोणतीही वस्तु आपण विकत घेवू शकतो. वस्तु तर इतक्या आकर्षक तर्हेने मांडलेल्या आहेत की ते दुकान आहे असे वाटतच नाही. आपल्या कल्पनेच्या पलीकडले ते सर्व होते. हवे तर आपण पण कँडल तयार करू शकतो. ऑटोबर मधे हॉलोविन हा सण असतो त्यावेळी लाल भोपळ्याला खुप महत्व असते ते खुप आकर्षक रितीने मांडले होते. तसेच ख्रिसमस ट्री अनेक प्रकारे सजवता येतो त्याचे इथे नमूने मांडलेले होते. आणि विविध वस्तुही होत्या, बाहेर खुप सुन्दर बाग़ होती. तिथे पण खुप फोटोग्राफी केलि. इथे कोठेही जा, सगळ फोटोजेनिक आहे.



५/९/०९ - अ‍ॅप्पल पीकिंग फार्म
प्रीतिने आम्हाला थाई रेस्स्टारंट मधे जेवायला नेले आणी त्यानंतर आम्ही लेमन ओर्चार्ड या ठिकाणी गेलो. हे एक फार्म असून ते ११०० एकरा मधे आहे. त्यात सफरचंद, पैर, रसबेरी, स्ट्राबेरी, पिच अशी फळे होतात. तिथे जावून आपल्याला हवी तेवढी फळे हातानी तोडून घ्यायची. जमा करतना तुम्ही हवी तेवढी फळे खाऊ शकता.  फार्म मधून बाहेर जाताना जेवढी फळे हवी तेवढी पैसे देवून घ्यायची. सुर्यफुलांचा तर भूल भुलैय्याच होता. एका मचानावरून पूर्ण फार्म दिसत होते. जिकडे पाहावे तिकडे हिरवी झाडे आणि त्यावर लाल लाल सफरचंद आणि हिरवी पैर, रसबेरी, स्त्रबेरी, असे मनमोहक दृश्य दिसत होते. झाडांच्या खाली सफर्चंदांचा सडा पडलेला होता, ते बघून वाईट वाटले. हा अनुभव खुपच वेगळा होता.



६/९/०९ - बोस्टन (Boston) सिटी
इथून १२० मैलावर बोस्टन हे ऐतिहासिक शहर आहे. तिथे एम्.आय.टी., ह्वावार्ड सारख्या जगप्रसिद्ध शीक्षण संस्था आहेत. चार्ल्स नदी किनरि वसलेल हे शहर म्यासचुसेटस (Massachusetts) या राज्यात आहे. तिथे ट्राफिक आणि पार्किंगचा प्रश्न असल्याने आम्ही अलेवाइफ़ या ठिकाणी गाड़ी पार्क करून तिथे असलेल्या रेड लाइन, ग्रीन लाइन आणि ओरेंज लाइन ह्या लोकलने प्रवास करून म्युझीयम ऑफ़ सायंस या ठिकाणी गेलो. तिथून डक टुरने आम्हाला सिटी टूरला जायचे होते. त्या अगोदर आम्ही चार्ल्स नदीच्या काठाने फिरत फिरत एम्.आय.टी. यूनिवर्सिटी बघण्यास गेलो. एम्.आय.टी. ही खुप मोठी असून ती जगप्रसिद्ध आहे. तिथे प्रवेश मिळने मानाचे समजतात आणि जगातून अनेक देशाचे मुले,मुली तिथे शिकण्या साठि येतात. इंजिनीअरिंग साठी एम्.आय.टी.उच्च प्रतिची समजतात. यातील मुलानी बनवलेले एक म्युझियम आहे 'त्यात विज्ञानावर आधारित प्रयोग आहेत. इथे रोबोट आहे, थ्री डी फोटो, फोर डी फोटो आहेत, एकाच माणसाचा फोटो वेगवेगळ्या दिशेने पाहिल्यास वेगवेगला दिसतो. अगम्य आशा गोष्टी इथे आहेत. वास्तुकलेचे विविध प्रकारचे मोडेल्स ठेवलेले आहेत. हे म्युझियम इतरांपेक्षा अनोखे होते.




त्यानंतर आम्ही डक टूरच्या बसने सिटी टूरला निघालो, बसचा ड्रायव्हर ८० वर्षाचा म्हातारा होता. इथे ७० ते ८० वर्षाचे लोक पण सगळीकडे काम करतात. तो सारखा क्वाक क्वाक (बद्काचा आवाज) करीत होता. त्याने आम्हाला प्रथम प्रूडेंशियल सेंटर, सर्वात उंच इमारत, ओब्झर्वेतरि, ख्रिश्चन सायंस सेंटर, ट्रिनिटी चर्च, पब्लिक गार्डन, बंकर हिल मोनुमेंट, लिओनार्ड द झाकिम, जगातील मोठा केबल पुल, ओल्ड स्टेट हाउस अशी अनेक ठिकाने दाखवली. तीच गाड़ी त्याने पाण्यात (नदित) उतरवीली आणि ती बोटी सारखी चालायला लागली, चार्ल्स नदित शिडाच्या नावा फिरत होत्या, अनेक छोटी मोठी जहाजे लागलेली होती, बोस्टनची स्कायलाइन दिसत होती, हे सर्व खुप मोहक होते. बोट कोणालाही चालवता येत होती, १५ मिनिटे फिरवून आम्ही परत बाहेर आलो. तिथून आम्ही प्रसिद्ध क्विंसी मार्केटमधे गेलो. हे मार्केट आपल्या तुळशी बाग सारखेच होते. छोटे छोटे स्टॉल तसेच छोटे गाडे यावर वस्तु विकन्यास होत्या. गर्दी पण तशीच होती. एक बाई स्कर्टचे १०० प्रकार करून दाखवित होती. एक माणुस कोणालाही समोर बसवून त्याचे व्यंगचित्र काढत होता. असे अनेक प्रकार होते. तिथून बोस्टन हार्बरवर गेलो, त्यावेळी सूर्य मावळत होता, पाण्यावर सुर्याचे लालकिरण छान दिसत होते. तिथेच एतिहसिक गार्डन पण होते. परत मेट्रो ट्रेन ग्रीन, रेड, ओरेंज या सर्व घेवून अलेवाइफ़ स्टेशनवर आलो.



७/९/०९ - स्टांम्फोर्ड (Stamford)
स्टांम्फोर्ड या गावी प्रीतिचा दिर राहतो. तिथे आम्ही ६ महीन्यांमधे बर्याचदा गेलो. ६ दिवस सलग होतो तेव्हा आम्ही तिथे कोर्ट, टाऊन हाल, चर्च, मोठा मॉल, बिच, आइस हॉकी वगैरे बघितले. तसेच इथे रस्त्यावर जत्रा (Fair) भरते, त्यात विविध प्रकारची टेंट लावून दुकान असतात. फ्रेम,ग्लास वर्क, फ्लोवेर पॉट, पॉटरी, पेटिंग्स, फोटोग्राफी, पर्सेस, टेबल, खुर्च्या स्वतः विनत होते. भाजा, फळे आणि ड्राय फ्रूट्स ,मिरर वगैरे यांची दुकाने होती. वाहतुकीचा रास्ता बंद करून हे सर्व चालू होते. एका स्टॉलवर पेंटिग खाली मिसेस कोले असे नाव लिहिले होते, मी तिला हे माझेही नाव असल्याचे सांगितले, तर ती म्हणाली आपन दोघी फ्रेंड झालो म्हणुन. तसेच एक बाई आपल्या छोट्या कुत्र्याला एका पर्स मधे घेउन आली होती. आशा अनेक गमती, जमती इथे दिसल्या.



१२/९/०९  - न्युयॉर्क पुन्हा एकदा
पहिल्या वेळी आमचे पूर्ण पाहून झाले नाही म्हणुन आम्ही परत एकदा न्यूयार्कला गेलो. यावेळी आम्ही प्रथम  मदाम तुसाद या जग प्रसिद्ध व्यॅक्स म्युझियम मधे गेलो, त्याला ३५ डॉलर तिकीट होते. असेच म्युझियम लंडन आणि वाशिंगटन येथे पण आहे. इथे मेणाचे पुतळे हुबेहुब माणसा सारखे केलेले आहेत. समोर प्रवेश द्वारावर एक पुतळा आहे तो आपल्याच स्वागताला उभा आहे असे वाटत होते. अगोदर लक्षात आलेच नाही की हा पुतळा आहे. इथे जगातील सगळ्या प्रसिद्ध व्यक्तींचे पुतळे आहेत. अमिताभ, गांधीजी, पोप जॉन पोल, दलाई लामा, यासर अराफात, लेडी डायना, बिल गेट्स, बिल क्लिंटन, नेल्सन मंडेला, रेगन, गोर्बाचेव्ह, मार्टिना, मर्लिन मनरो, बराक ओबामा आशा सगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींचे हुबेहूब पुतळे बनविले आहेत. आम्ही सगळ्यासोबत फोटो काढले. चेहर्‍या वरील हावभाव, उभे राहण्याची ढब अगदी जिवंत माणसा सारखेच केले आहे, हे सर्व पाहून त्या बनवनार्‍या व्यक्तीचा अचंबा वाटतो. तुम्हाला जर सांगितले नाही तर कलणारही नाही की, हा पूतळा आहे.



त्या नंतर आम्ही वैभवचे ऑफिस क्रेडिट सुस येथे गेलो, ह्या ईमारतीच्या २२ व्या मजल्या वरुन न्यूयार्कची सर्वात उंच ११० मजली एम्पायर स्टेट बिल्डिंग दिसते आणि सम्पूर्ण  न्युयॉर्क शहराचा व्ह्यु दिसतो. तिथून आम्हाला खुपच छान नजारा दिसला. पुढे मेट्रोने ग्रैंड सेन्ट्रल टर्मिनलला गेलो, जे न्यूयार्क चे सर्वात मोठे टर्मिनल आहे. ते स्टेशन वाटतच नाही, इतके सुन्दर इन्टेरियर केलेले आहे, सगळेजन फोटो काढन्साठीच आले होते जनु. आत मोठे मार्केट पण आहे.



एम्पायर स्टेट बिडिंगच्या ११० मजल्यावर लिफ्टने जाता येते. ३५ डॉलर तिकीट आहे, तिथून सम्पूर्ण न्युयार्कचे दर्शन होते. फ़क्त १०३ व्या मजल्यावर जाता येते, वर ऑब्झरवेटरी आहे. १०३ व्या मजल्यावर  फ़क्त लाईट सोडतात, कधी लाल,हिरवा,पिवला असतो. आज पिवला सोडलेला होता. रस्त्यावरून खुप छान दिसत होते, खुप फोटो काढले.
आता अंधार पडला होता. परत वैभवच्या ऑफिस मधे गेलो, नाईट व्ह्यु साठी. २४ व्या मजल्यावरुन परत सगळे न्यूयार्क बघितले, रंगीबेरंगी उंच उंच इमारतिवरिललाईटचा झगमगाट पाहून असे वाटत होते की आपण स्वर्गातच आहोत की काय. एका ब्रिजवर सम्पूर्ण लाईट लावले होते, ते पण छान दिसत होते, चारही बाजूने आम्ही न्यूयार्क पिंजुन काढले. मनसोक्त सफ़र झाली. आता भारताचे वेध लागले आहेत, कारण आता आम्हाला इथे येवून ६ महीने होतील. आता मायदेशी परत जाण्याची ओढ़ लागली आहे.



१९/९/०९ - न्यूपोर्ट (Newport)
आज आम्ही रोड आयलँड (Rhode Island) या राज्यातील न्यूपोर्ट या समुद्र काठी असलेल्या टुमदार आणि रमणीय शहरात गेलो. आज हवामान खुप छान होते. थोडीशी थंडी आणि कोवळे उन होते. क्लिफ वॉक (cliff walk) हा सुमारे साडे तिन मैलाची संपूर्ण पायवाट समुद्र काठाने होती. एका बाजूने अ‍ॅटलांटीक समुद्र आणि दुसर्‍या बाजूने सुंदर सुंदर मॅन्शन (mansion), असे या वॉकवर एकून ६४ म्यान्शन होते. फक्त १२ मॅन्शन बघण्यासाठी खुले होते. या वॉकच्या दोन्ही बाजूने खुप झाडे होती, हा वॉक सुद्धा खुप छान होता.



न्यूपोर्टच्या रस्त्यावर दोन सुंदर ब्रिज होते. एक होता पेल ब्रिज, तो रात्रि लाईट मध्ये अजुनच छान दिसत होता. क्लिफ वॉक वर जेवढी मॅन्शनहोती ती एकापेक्षा एक सुन्दर होती. त्यापैकी काही खाजगी होती ती बघण्यास परवानगी नव्हती. एक मार्बल मॅन्शन, एक रगल, एकाचे नाव द ब्रेकर्स असे होते. ब्रेकेर्स हा खुप मोठा होता, तो पाहण्यासाठी खुप लोक आत जात होते. समुद्र काठी खुप खाजगी छोट्या छोट्या बोटी पार्क केल्या होत्या, लोक त्या आपल्या कारच्या मागे लावून नेतात, पाहिजे तेव्हा समुद्रात नेवून विहार करतात. येथील लोक खुपच हौशी आहेत. समुद्र किनारी खुर्च्या टाकुन वाचत बसतात, तसेच सन बाथ घेतात. एकेठीकाणी काही लोक पतंग उडवत होते, यात बायका जास्त दिसल्या.
आमच्या समोर एक बाई कार घेवून आली कार समुद्राच्या पाण्यात नेली दूसर्‍या माणसाने बोट तिच्या कारला जोडून दिली ती बोट घेवून ती गेली, तेव्हा ती एकटीच होती. एक क्रूज समुद्रात नांगरलेले होते ते खुप मोठे होते. तिथून आम्ही ओशन स्ट्रीट वर गेलो. हा रस्ता पण समुद्र काठाने होता, गाडीतून फिरताना खुप छान वाटत होते. ओशन स्ट्रीट वरून एका स्टेट पार्क मधे गेलो. तिथे अनेक बायका आणि पुरुष पतंग उडवत होते. राम आणि प्रितीचे बाबांनी एका स्त्री कडून पतंग मागुन घेतला आणि त्यानी पण उडवन्याचा आनंद घेतला. तिथून फोर्ट अ‍ॅडम्स, न्यूपोर्ट हार्बर, एस्टन बिच येथे पण गेलो तसेच ओशन पार्क मधून सनसेट पण बघितला, सूर्य मावळताना पाणी ताम्बडे लाल झाले होते, दृश्य तर खुपच छान होते. खुप दिवसांनी असा चांगला सुर्यास्त पहायला मिळाला.



आता आमचे जवळ जवळ बरेच पाहून झालेले आहे. ६ महिन्यात दर विकेंडला एका ठिकाणी जावून अशी बरीच ठिकाने आम्ही बघितली. येथील लोक खुपच आदराने वागतात. ओळख नसली तरीही बघून हसतात आणि हाउ आर यु असे म्हणतात. तसेच दुकानात खरेदीला गेले तरी थँक यु वेरी मच असे म्हणतात. पोस्टमन जरी असला तरीही आपल्याला हाय करतो.

सुरुवातीला सांगण्याची गोष्ट आता लिहिते. अमेरिकेचा शोध कोल्म्बसने लावला. पहिले राष्ट्रध्यक्ष वाशिंगटन होते, तसेच रूझवेल्ट यांनि अमेरिकेला प्रतिष्ठा मिळवुन दिली आणि विस्तार जेफरसन यानि केला. दीन दलित कैवारी आणि सिव्हिल वार याचे तारनहार अब्राहम लिंकन याना मानतात. १३ लाल पट्टे पूर्वीची कॉलनि आणि ५० राज्याचे ५० असे तारे ध्वजावर आहे.

येथील भाजा, फळे आकाराने खुपच मोठे असतात. कोथिम्बिर ५० रुपयाला तर कदिपत्ता २५ रु. ला असतो. कीमती $७.९९ अशा अपूर्ण किमतीत असतात. उरलेला १ सेंट पण दुकानदार परत देतो. येथील मुले, मुली एकमेकांशी खुपच मोकळेपणाने वागतात. स्त्रिया डिलिव्हरी नंतर ८ दिवसात बाहेर पडतात. आशा भरपुर गोष्टी आहेत ज्या आपण इथे अनुभव घेतल्या शिवाय कळत नाहित.

इथे वाल मार्ट, टारगेट, कॉस्टको, ओल्ड नेव्ही, बिग वाय, मार्शल, मायकेल सारखे अनेक चेन शोप्स आहेत, ते शहरात तसेच छोट्या गावात पण आहेत. छोट्या गावात पण शहर सारख्याच सुखसोई असतात. फक्त गावाची लोकसंख्या तेव्हढी कमी असते म्हणुन खेडे म्हणायचे. घरासमोरील गवत दर ८ दिवसानी कापतात, तसेच आठ दिवसांनी पेस्ट्रीसाइड पण करता. त्यामुळे, डास, झुरळ, पाली दिसत नाहित. घराच्या मागे ख्रिसमस ट्रीचे फार्म आहे, त्यात झाडे लावतात, नाताळात लोक झाडे विकत नेतात, ती तोडली की त्या जागी दूसरी झाडे लावतात. नळाला २४ तास गरम पाणी असते.



तसेच सार्वजनिक ठिकाणी कमीत कमी ६० ते ७० टक्के लोकांकडे एक तरी कुत्रे असते. कधी कधी तर दोन दोन कुत्री पण असतात, कुत्र्याच्या खाद्याचे वेगळे सेक्शन असते, त्यांच्या साठी कपडे, स्वेटर, छत्री, वेगळि गाडी पण असते. एक बाई बॅगेतुन छोटे पीलू घेवून फेअर पाहण्यासाठी आली होती, तर एकजन कुत्र्याला गाडीत बसवून त्यावर छत्री लावून फिरत होता.
इथे जुळ्या मुलांचे प्रमाण जास्त दिसते, त्यांच्या साठी डबल स्ट्रोलर असते. प्रत्येक कुटुंबात सरासरी कमीत कमी तिन मुले असतात. कधी कधी चार, पाचही दिसतात.




लठ्ठपणा हा एक इथला गुण दिसला. साधारण ५० टक्के स्त्रि-पुरुष लठ्ठ दीसतात. आपण फिरायला बाहेर पडतो, तेव्हा खाण्याचे खुप हाल होतात, कारण डंकिन डोनट्स, टॅको बेल, सब वे, मॅडोनाल्ड आशा ठिकाणी सर्व नॉनव्हेज प्रकारच जास्त मिळतात. आपण सांगितले तर व्हेज पिज्जा, बर्गर किंवा इतर काही पदार्थच मिळतात. नो मिट (meat) असे सांगावे लागते. येथील १०० टक्के लोक मांस खातात आणि बरेच लोक फ्रोझन फुड पण खातात. ब्रेड आणि केकचे तर शेकडो प्रकार इथे मिळतात.

खुप बिल्डिंग एकत्र असल्यास त्याला अपार्टमेन्ट म्हणतात, २ ते ४ बिल्डिंगच्या मधे एक बंदिस्त कचरा पेटी असते, एक दिवस आड कचरा नेतात, रीसायकलिंगच्या कचर्‍या साठी वेगळे खोके असते त्यात वस्तु ठेवायच्या दर १५ दिवसांनी येवून कचरा नेतात. रस्ते तर इतके स्वछ असतात की विचारू नका. प्रितीच्या अपार्टमेंटचे नाव विंडवुड अपार्टमेंट असून, तिथे स्विमिंग पुल, प्ले एरिया आहे. तसेच एका बिल्डिंग मधे ८ अशा २० इमारती आहेत, घरापुढे छान लॉन आहे, झाडे तर पुष्कळच आहेत.
                                                                                                                                                                  


छोटे गाव असेल तर गावात कोणी रहते का नाही वाटते कारण रस्त्यावर एकही माणुस दिसत नाही, फ़क्त कारच कार दिसतात. फक्त डाउन-टाउन मधे थोडे लोक दिसतात. डाउन टाउन म्हणजे आपल्या कडील गावठाण.  रस्त्याचे तर इतके जाळे आहे की नविन माणसाला लवकर काळतच नाही. रस्ते ३-४ पदरी असतात, रस्त्यावरून जाताना चुकून स्पीड वाढला तर लगेचच पोलिस फाइन लावतात किवा पॉइंट देतात आणि इंशुरन्सचा हप्ता वाढल्याचे घरी पत्र येते. एका एका ठिकाणी चार ते पाच रस्त्याचे ब्रिज एकत्र येतात. इथे रेल्वे खुप कमी आहेत, आणि रेल्वेचा पण खुप महाग पडतो (कारच्या पेट्रोल पेक्शा एकट्या माणसाच तीकीट जास्त आहे).

रामच्या शाळेत गेलो, मुलांना डोनट दिले तर टीचरनि सर्वाना एकत्र खायला लावले. सगळ्यांना आमची ओळख करून दिली, समुद्र ओलांडून आलो आहेत असे सांगितले. जगाच्या नकाशावर इंडिया दाखवला. सगळ्यांसोबत फोटो काढायचे तर काही पालकांची परवानगी नव्हती म्हणुन त्या मुलांना बाजूला बसवले. मुलांसाठी भरपूर खेलणी आहेत, मोठे जिम आहे, जिम मधे सायकल्स आहेत, वर्ग आहे असे वाटतच नाही, दिवसभर मुले पेटिंग करत असतात, उन्हाळ्यात मुलाना बाहेर मातीत खेळायला सोडतात.थंडित जिमच्या हॉल मधे खेळतात बर्फावर पण खेळायला सोडतात. रामची टीचर पाकिस्तानी आहे त्या मुळे आम्ही तीच्याशी हींदी मधे गप्पा पण मारल्या.



रामला पोहण्याचा क्लास लावला तिथे चार मुलांना एक टीचर होते. ते नाचत नाचत मुलांना स्विमिंग शिकवत होते. स्विमिंग पुल लहान मुलांसाठी वेगळा होता. त्यात नऊ महिन्याच्या मुलाला देखिल त्याची आई घेउन आली होती आणि त्याला पाण्यात चालवत होती. एका बाई सोबत दोन मुली होत्या, त्या पोहत होत्या आणि एक मुलगी तिच्या पोटाला लावलेल्या बॅगेत होती. म्हातार्‍या बायका देखिल स्विमिंग सूट घालून स्विमिंग करत होत्या. स्विमिंगला येताना सोबत खाण्याच्या वस्तु घेवून येतात, स्विमिंग झाल्यावर खाण्याचा कार्यक्रम असतो. स्विमिंग पुल तर खुपच छान जागेत होता, सभोवती हिरवी हिरवी झाडी होती.



माझी मुलगी प्रीति हिला नवीन पदार्थ करण्याचा खुप शौक आहे, ती इन्टरनेट वरील वेगवेगळ्या साईट बघून सारखे विविध पदार्थ करत असते. पाय (pie) पासून तिने मन्गो पाय बनविला, पफ पेस्ट्री, चायनीज नूडल्स, मंचूरियन, तसेच अनेक प्रकारचे केक, मन्गो केक, लेमन केक, कॅरट केक असे अनेक भारतीय तसेच अमेरीकन पदार्थ तीने करुन खाऊ घातले.



येथील लोक कोठेही लग्न करतात, अगदी लेकवर, बोटीत, जंगलात, बागेत, बीचवर आणि रस्त्यावर सुद्धा. पार्क, रस्ता, जंगलामधे फोटो काढन्यासाठी सुधा जातात. बोस्टनला आम्हाला हे मजेदार दॄश बघायला मीळाले.



२७/९/०९ - दसरा
आज दसरा, पण प्रीति आणि श्रीकांत याना सुट्टी नसल्याने ते ऑफिसला गेले. श्रीकांतचे आई,बाबा स्ताम्फोर्ड ला असल्याने ते इथे नव्हते. आम्ही मंदिरात जाणार होतो, पण त्या दोघाना प्रशस्त वाटेना. मोठ्याचे आशीर्वाद घेतल्याशिवाय बरे वाटेना, मनाला काही तरी चुकल्या सारखे वाटत होते. रुखरुख लागली होती, म्हणुन आम्ही स्ताम्फोर्द्ला जावून आई,बाबाना सरप्राइज़ देण्याचे ठरवले. ऑफिस मधून दोघेही लवकर घरी आले आणि आम्ही तिथे ६.०० वा.पोचलो.पण ते घरी नव्हते. फोन वरून सहज चौकशी करत आहोत असे दाखवून कोठे आहेत ते विचारू घेतले. एकदम श्री.गन्नू यांची बेल वाजवली, त्याना वाटले की, कोणी तरी असेल म्हणुन सगळ्यानी अगोदर दुर्लक्ष्य केले, पण रामला एकदम समोर बघून ते सर्वजन आर्श्चय चकित झाले. त्यांचा डोळ्यावर विश्वासच बसेना आणि त्या सगळ्यानी इतका आनंद झाला तो त्यांचे चेहर्यावर प्रतीत होत होता. भाऊने एकदम रामला वर उचलून घेतले आणि त्याचे पटापट पापे घेतले, की ते दृश्य बघून सर्वांचे डोले एकदम पानावाले. सर्वाना एकदम धक्का बसला, कारण आज वर्किंग डे होता, त्यामुले आम्ही तिकडे जाण्याची शक्यता कमी होती. सर्वानी एकमेकाना शुभेच्छा दिल्या आणि हा दसरा आमचा अनोख्या रितीने साजरा झाला. मग सर्वानी सोबत फोटो सेशन केले.


आता इथे फाल कलर सुरु आहे. मेपलच्या झाडांची पाने आता लाल आणि पिवळ्या रंगांची होत आहेत आणि इतरही झाडांची पाने रंग बदलत आहेत. सृष्टी आता रंगानी नटलेली आहे, तसेच झाडांची पाने पण गळत आहेत. लाल, हिरवा आणि पिवळा सर्व रंग एकत्र आल्याने खुपच सुन्दर दिसत आहे. डोंगरावर तर सगळी झाडे खुपच आकर्षक दिसत आहेत.



आमचे ४ ऑक्टोबरचे भारतात परत जाण्याचे तिकीट आहे. आता कधी एकदा परत जातो असे झाले आहे. इथे येताना जेवढी उत्सुकता होती तेव्हढीच परत जाण्याची ओढ लागली आहे. कारण जरी इथे मुलगी, जावाई आणि नातू असले तरी भारतातील मुलगी, मैत्रिणी, आणि सगळे नातेवाईक यांना कधी एकदा भेटू असे झाले आहे. आपल्या मायभूची ओढ काही वेगळीच असते. परदेशात कितीही दिवस राहिलो तरी शेवटी आपली मायभूमि हीच खरी. आता अमेरिकेला बाय बाय, पुन्हा कधी योग येइल काही सांगता येत नाही परंतु हा अनमोल ठेवा ह्रदयात आयुष्यभर जतन करून ठेवू. आता आम्हा दोघांच्या आयुष्यात काहीही अनुभवायचे आमच्या मुलीने आणि जावयाने शिल्लक ठेवलेले नाही. आम्ही अगदी तृप्त तृप्त आहोत. त्यांना पुढील आयुष्यात खुप खुप आशीर्वाद. आम्ही जिवंतपणी स्वर्ग अनुभवाला आहे, आम्हाला भावना व्यक्त करण्यास शब्द अपुरे पडतात, आणि त्यांच्या ॠणातुन आम्ही कधीच मुक्त होणार नाही; होऊ इच्छित नाही.


No comments:

Post a Comment