Sunday, September 27, 2009

अमेरिकेतील रम्य दिवस - जून महिना



२१/६/०९ - रोज फेस्टिवल, एलिजाबेथ पार्क, हार्टफोर्ड
इथून जवळच एलिजाबेथ पार्क मधे रोज फेस्टिवल असतो. इथे शेकडो रंगाची गुलाब पुष्पे होती. कुठे पाहू नि कोठे नाही असे होत होते. काही एक पाकळीची तर काही गुच्छ आणि विविध रंगची अनेक झाडे होती. कमानिवर गुलाबाचे वेल सोडलेले होते. कारंजे आणि त्यात अनेक बदके होती. खुपच छान नजारा होता. सगळीकडे गुलाबच गुलाबचे साम्राज्य होते.



२६/६/०९ - आलस्टोम ची पार्टी
आपल्या इथे संस्कृति जसे आहे तसे हे हाय मीडोज होते. टॅटू काढ़णे, रोक क्लायम्बिंग, मिनी गोल्फ, व्होलिबोल असे वेगळे वेगळे प्रकार इथे होते. प्रितीच्या ऑफिसची इथे पार्टी होती. आम्ही दिवसभर खाऊन व् खेळुन खुप एन्जॉय केले.



२७/६/०९ -ड्यानबरी पार्क फायर वर्क्स
ड्यानबरी पार्क इथे क्यांडलवुड लेकवर स्वातंत्र्य दिनानिमित्त फायर वर्क्स होते. इथे १५ दिवस आधी आणि १५ दिवस नंतर सुद्धा सगळीकडे  साजरा करतात. फायर वर्क्स लेकच्या मधे आयलंडवर होते त्यामुले पाण्यात त्याचे प्रतिबिम्ब पडायचे ते इतके सुन्दर दिसत होते की, आपोआपच तोंडातून वाह वाह असे उद्गार निघत होते. जवळ जवळ अर्धा तास हा कार्यक्रम चालू होता.











1 comment:

  1. Excellent!!
    I enjoyed it reading very much. You have expressed it very beautifully. I am very joyous to have read this blog. It is a simple straightforward writing from the heart..

    Thankyou

    Vishal Shetti

    ReplyDelete