3/७/०९ - टोरंटो, कॅनडा
टोरंटो ही कॅनडाची राजधानी आहे, तिथे सध्या जगात सर्वात उंच असलेला सी.एन. टॉवर आहे. त्याला १२० मजले आहेत, त्याची उंची १८०० फुट आहे. इथे खुप मोठा लेक ओंटारियो आहे आणि जगात सर्वात मोठा योंग स्ट्रीट पण इथेच आहे. अमेरिका आणि कॅनडा यांना जोडणारा रेनबो ब्रिज आहे. नदी ही दोन्ही देशाला जोडणारी नदी आहे आणि दोन्ही देशाची मालकी निम्मी निम्मी आहे. यु.एस.च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नायगरावर फायर वर्क्स करतात. ते दृश्य तर खुपच अप्रतिम होते. नायगरा हा निसर्गचा चमत्कार आहे.
टोरंटो ही कॅनडाची राजधानी आहे, तिथे सध्या जगात सर्वात उंच असलेला सी.एन. टॉवर आहे. त्याला १२० मजले आहेत, त्याची उंची १८०० फुट आहे. इथे खुप मोठा लेक ओंटारियो आहे आणि जगात सर्वात मोठा योंग स्ट्रीट पण इथेच आहे. अमेरिका आणि कॅनडा यांना जोडणारा रेनबो ब्रिज आहे. नदी ही दोन्ही देशाला जोडणारी नदी आहे आणि दोन्ही देशाची मालकी निम्मी निम्मी आहे. यु.एस.च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नायगरावर फायर वर्क्स करतात. ते दृश्य तर खुपच अप्रतिम होते. नायगरा हा निसर्गचा चमत्कार आहे.
४/७/०९ - नायगरा फाल्स
नायगरा बघायचा योग कॅनडा साईडने आला. कॅनडा साईडने फॉलचा व्ह्यु अप्रतिम दिसतो. नायगरा, हे तर जणू स्वर्गीय ठिकाण आहे. अमेरिकेच्या बाजुने गोट आयलंडवरुन हे फॉल्स बघता येतात. अमेरिकन फॉल आणि ब्रायडल फॉल एका बाजुला, आणि दूसरा हॉर्स शु फॉल. हॉर्स शु फॉल, हा घोड्याच्या नाली सारखा आहे म्हणुन त्याला होर्स शु फाल म्हणतात. केव्ह आफ द विंड आणि मेड आफ द मिस्ट या राइड द्वारे आपल्याला फॉलच्या अगदी जवळ जाता येते. एका दोन मजली उघड्या बोटीतुन आपल्याला फॉल जवळ नेतात तेव्हा पाण्याचे तुषार अंगावर उडाले की अंगावर रोमांच उभे राहतात. खुपच वेगळा अनुभव होता. दूसरी राइड म्हणजे केव्ह ऑफ़ द विंड (ही फ्क्त अमेरिका साईडनेच आहे). ह्या राइडने आपल्याला ७० फुट लिफ्टने खाली नेतात, त्यानंतर लाकडी शिडीने ब्रायडल फॉलच्या अगदी पाण्याखाली जाता येते. पाण्याचे ते रौद्र रूप पाहून आम्ही अचंबितच झालो. दर सेकंदाला ७५ हजार क्यूसेक्स पाणी खाली पड़ते, त्याला खाली जाण्यास फक्त ३ सेकंद लागतात. पाणी कधी आटत नाही. फ़क्त एकदाच कोरडा पडला आणि एकदाच त्याचा बर्फ झाला होता, त्याचे फोटो पण आहेत. नायगरा इथे स्काय व्हील (कॅनडा बाजूने ) आणि ओब्ज़र्वेशन टॉवर (अमेरिका साईडने) पण आहे.
५/७/०९ - एक अविस्मरणिय अनुभव
यानंतर आम्ही नायगरा फॉल अमेरिका साईडने बघायला गेलो तिथून रात्रि परत येताना १.३० वाजले. प्रीतिचा दिर गाड़ी चालवित होता, अचानक गाडीला धक्का बसला, सगळे अर्धवट झोपेत होते, काय झाले कळेना, गाड़ी डिव्हायडरच्या बाजूला कलली. अनावधानाने पेट्रोल संपले होते. कॅनडात फोन चालत नाही म्हणुन एकही फोन चार्ज नव्हता, एक थोडा चालू होता, त्यावरून इथे गायकों ही इंशुरन्स सर्विस असते त्याना फोन केला पण तो उचलत नव्हते. काय करावे काय नाही, सर्वजन चिंतातुर होते. आम्ही देवाचा धावा करीत होतो, तेव्हढ्यात एक हायवे पॅट्रोलिंग करणारा मनुष्य आमच्या जवळ आला आणि काय झाले ते विचारले. आम्ही पेट्रोल संपल्याचे सांगितल्यावर त्याने ताबडतोब आम्हाला पेट्रोल देण्याचे कबुल केले. १० मिनिटात एक माणुस तेथे पेट्रोल घेउन आला आणि त्याने पैसे पण घेतले नाही, नंतर अकाउंट मधे टाका म्हणाला. हा अनुभव खुप अनोखा होता.
११/७/०९ - ग्रीनविच आयलँड
ग्रीनविच आयलँडला जाण्यासाठी बोट राइड घ्यावी लागते. बोटीतुन जाताना समुद्र किनारी सुंदर सुंदर आणि मोठ मोठे लॉन असलेले बंगले होते, त्याच्या मालकांनी आपापल्या बोटी पार्क केल्या होत्या, आणि हवे तेव्हा ते बोटिंग करीत, या आयलँड जवळच छोटेसे आयलँड होते, त्यावर एकच बंगला होता, त्या माणसाला किती छान वाटत असेल सभोवती सगळे पाणिच पाणि आणि मधे आपण एकटे. हेही आयलँड खुपच छान होते.
ग्रीनविच आयलँडला जाण्यासाठी बोट राइड घ्यावी लागते. बोटीतुन जाताना समुद्र किनारी सुंदर सुंदर आणि मोठ मोठे लॉन असलेले बंगले होते, त्याच्या मालकांनी आपापल्या बोटी पार्क केल्या होत्या, आणि हवे तेव्हा ते बोटिंग करीत, या आयलँड जवळच छोटेसे आयलँड होते, त्यावर एकच बंगला होता, त्या माणसाला किती छान वाटत असेल सभोवती सगळे पाणिच पाणि आणि मधे आपण एकटे. हेही आयलँड खुपच छान होते.
१८/७/०९ - न्यूयार्क
न्युयार्क ही तर स्वप्नांची दुनियाच आहे. न्युयार्क आणि जर्सी सीटी ही जुळी शहरे आहेत. त्याना जोडणारा टनेल हडसन नदी खालूंन सव्वा मैल आहे. तसेच स्ट्याच्यु ऑफ़ लिबर्टी हा स्वातंत्र्य देवतेचा पुतळा हडसन नदीत आयलंड वर आहे. त्याची उंची ३०५ फुट आहे आणि वजन २२५ टन आहे. प्रत्येक खंडाचा एक, असा मुर्तिच्या क्राउनला ७ किरण आहेत. तसेच हा पुतळा आयफेल टॉवर ज्या आर्किटेक्टने(आयफेल) बनवला आहे. फ्रान्सने हा पुतळा अमेरिकेला भेट दिला आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटर वर हल्ला झाल्या नंतर हे स्मारक ४ महीने बंद ठेवण्यात आले होते. पुतळ्याच्या आतून पायर्या असून त्याने क्राउन पर्यंत जाता येते. हे अमेरिकेचे राष्ट्रिय स्मारक आहे.
तसेच सर्व जगाचे शेअर मार्केटचे व्यवहार जिथून चालतात ते वॉल स्ट्रीट, तिथे उसळत्या शेअरचे प्रतिक म्हणुन धातुचा बैल आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जागी आता स्मारक बांधत आहेत. टाइम स्क्वेअर हे एक न्यूयार्क मधील प्रसिद्द ठिकाण आहे. चारही बाजूने तिथे मोठ मोठे स्क्रीन आहेत त्यावर ५० वर्षापासून प्रॉडक्ट जाहिराती झळकत असतात. सगळा दिव्यांचा झगमगट असतो. रात्रभर हा चौक जागा असतो. ३१ डिसेंबरच्या रात्रि तर इथे जल्लोषच असतो. न्युयार्कमधे चायना मार्केट पण खुप मोठे आहे.
........तसेच इथे प्रत्येक रोडवर चार लेन असतात. काही रस्यांवर जास्त माणसासाठी डाविकड़ची फास्ट लेन असते. कमी स्पीडसाठी मधली लेन, फास्ट लेन (HOV) मधे एक माणसाला अलौड़ नाही. स्पीड तासाला ६५ मैल म्हणजे आपले अंदाजे १०५ की.मी. होतात. ट्रिपल ए ही रोड सर्विस आणि ९११ वर केव्हाही फोन करा ताबड़तोब हजर. अपंग, म्हातारे या लोकांसाठी ट्रेन, बस, पार्किंग, मॉल, टॉयलेट येथे स्वतंत्र व्यवस्था, तसेच लहान मुलांसाठी बस, ट्रेन, टॉयलेटमधे पण वेगळी सोय असते. टॉयलेट मधे एक प्लेटफार्म असतो त्यावर मुलाचे डायपर चेंज करता येते. अटोमॅटिक कार वॉश, तसेच पेट्रोल पम्पावर देखिल कोणीही नसते. फ़क्त कार्ड स्वाईप करावे लागते. रस्त्यात सिग्नल नसेल तर पादचारी पाहून कीतीही स्पीड मधे असेल तरीही गाड़ी थांबवतात. मुलगी नॉर्थला रहात असल्याने तिथे बर्फाचे थर एक फुटापर्यंत जमतात आणि कनेक्टिकट हे राज्य जंगलाचे आहे. तिच्या घराच्या पाठीमागे जंगल असल्याने केव्हाही हरिण, रॅकुन (कोल्ह्यासारखा), ससे, टर्की हे प्राणी येतात. ससे तर दररोजच दिसतात.








No comments:
Post a Comment